September 8, 2024

ppr

कर्मयोगी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

Spread the love


डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती व रायफल शूटिंग या क्रीडास्पर्धे मध्ये श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथील विद्यार्थ्यानी यश संपादित केले आहे. सदरच्या कुस्तीस्पर्धेचे आयोजन सांगोला येथी फॅबटेक इंजिनिरिंग कॉलेज येथे तर रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन पिलीव येथे करण्यात आले होते.
आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये कर्मयोगी अभियांत्रिकीच्या ऋषिकेश देवकर याने ६५ किलो फ्री स्टाइल कुस्ती प्रकारामद्धे प्रथम क्रमांक पटकावला तर ७० किलो फ्री स्टाइल प्रकारामध्ये करण माने याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ६०किलो फ्री स्टाइल कुस्ती प्रकारमध्ये सोमनाथ जुमाळे याने प्रथम क्रमानक मिळविला. कुस्ती स्पर्धे मध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी होणार्‍या विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
तसेच रायफल शूटिंग या प्रकारामध्ये कर्मयोगी अभियांत्रिकीच्या आदित्य सादिवाले याने सुवर्ण पदक, रुद्राक्ष बिराजदार, ऋतुजा लवंड व वृशाली बाबर यांनी रजत पदक पटकावून सर्वसाधारण विजेजेतेपद मिळविले. रायफल शूटिंग मध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ मेरठ (उत्तर प्रदेश) या ठिकाणी होणार्‍या विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील शिक्षणा बरोबरच शारीरिक शिक्षणाचे ही प्रशिक्षण दिले जाते व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून घेण्यात येणार्‍या विविध क्रीडास्पर्धेत मध्ये मिळालेल्या यशातून दिसून येत आहे याचे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख श्री गणेश बागल तसेच सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.