November 21, 2024

ppr

सिद्धेवाडी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज तातडीची बैठक

Spread the love

सिद्धेवाडी प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठायुद्धा मनोज जरांगे – पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सिद्धेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करायची का नाही यासाठी उपोषणस्थळी आज शुक्रवार दि.३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ (सात) वाजता बैठक आयोजित करण्यात येणार आहे. कालच राज्य शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांना भेटल्यानंतर सदर बैठकीत पाटील यांनी कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासनाला २ जानेवारी २०२४ पर्यंत अर्थात २ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सदर कालावधीत शासनाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे तसेच महाराष्ट्रात मराठा बांधवांच्या वरती दाखल झालेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटूंबाला शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशा अनेक मागण्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी समाजाशी चर्चा करूनच आमरण रुपांतर उपोषणाचे साखळी उपोषणात करण्याचा निर्णय घेतला आहे, पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सिद्धेवाडी येथे गेली पाच दिवस साखळी उपोषण सुरू आहे सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी कोणती भूमिका घेतली आहे व पुढील आंदोलनाची दिशा कशी राहणार आहे.या विषयी चर्चा करण्यासाठी सिद्धेवाडीतील साखळी उपोषण स्थगित करायची का नाही. आज समाजाची बैठक बोलविण्यात आली आहे. तरी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

“एक मराठा लाख मराठा”